Recents in Beach

About Us



 

द आर्टिस्ट इन्फो या संकेत स्थळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील चित्रकला कलाकारांची माहिती आपल्याला मिळेल. सदर संकेत स्थळावर चित्रकार नोंदणी मोहीम सुरु आहे. उल्का फौंडेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम सुरु करण्यात आलेला असून सदर नोंदणी ही विनामुल्य आहे.
डिजिटल युगात चित्रकारांना एक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि त्यातून त्यांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध व्हाव्यात हेच धोरण समोर ठेऊन "The Artist Info" या संकेतस्थळाची सुरवात करण्यात आलेली आहे. 

"Art Teacher Activity"

चित्रकला शिक्षक यांच्यासाठी या संकेतस्थळावर "Art Teacher Activity" या पेज ची निर्मिती करण्यात आलेली असून, आपल्या शाळेत विविध उपक्रम राबविणाऱ्या कलाशिक्षकांची माहिती आणि त्यांनी राबविलेला उपक्रम या संकेत स्थळावर आपण प्रदर्शित करणार आहोत. जेणेकरून शाळेच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना हा उपक्रम समजेल.

"Artist Of the Month"

प्रत्येक महिन्याच्या सुरवातीला एका चित्रकाराची निवड करून चित्रकले संबंधी त्यांचे विचार , त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची चित्रे आणि त्याबद्दल त्यांचे विचार, त्यांच्या चित्राच्या शैली बद्दल माहिती, अशी सर्व माहिती आपल्याला या पेज वर बघायला मिळेल.

"विशेष लेख"

कलेचा इतिहास किंवा काम करण्याच्या विविध शैली (उदा.मूर्त अमूर्त) अशा विविध प्रकारच्या विषयांबाबतीत लेखन या पेज वर आपल्याला वाचायला मिळेल.यात चित्रकला क्षेत्रातील वरिष्ठ तसेच नवोदितांचे अनुभव, यातसमाविष्ट कार्यात येणार आहे.
(सदर वेबसाईट चे काम अजून सुरू आहे.) 

(या वेबसाईट वर कलाकार नोंदणी साठी कोणतेही शुल्क आकारले जात नसून,जर कुणाला आर्थिक स्वरुपाची मदत करण्याची इच्छा असेल तर ती मदत स्वीकारली जाईल)

Post a Comment

0 Comments