Recents in Beach

Dinesh Madhukar Salunkhe.

Event (International Puppet Show Artist)

श्री.दिनेश मधुकर साळुंखे. (अंतराष्ट्रीय दर्जाचे बाहुली नाट्य कलाकार)


आपल्या भारतात विविध परंपरा,धर्म, जाती आणि विविध लोककला. ज्या परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिली जाते. अशा या लोककलेतील “कठपुतली कला” (puppet show) ही राजस्थानचे प्रतिनिधित्व करते.

या कलेचे उगमस्थान म्हणून भारताला ओळखले जाते.”लोककला” लोकांनी लोकांच्या मनोरंजनासाठी सादर केलेली कला म्हणून संबोधले जाते. अशी ही “कठपुतली कला” मला अवगत करता आली याचे सर्व श्रेय माझे कलाशिक्षण काळातील वर्गशिक्षक आ. श्री विनोद पाटील सर व ललित कला महविद्यालयाचे प्राचार्य आ.राजेंद्र महाजन सरांना.

पाटील सरांनी कलाशिक्षणात “बाहुली काम” विषय नव्याने समाविष्ट झाला आहे, याबद्दल माहिती दिली. मला पुस्तकांचा छंद होता. एका लग्नाच्या निमित्ताने अकोला जात असतांना भुसावळच्या रेल्वे स्टेशनवर काही पुस्तक विकत घेतली होती.

ती मला आठवलीत त्या पुस्तकांमध्येच बाहुली कामाची माहिती दिली होती ती वाचून छोट्या छोट्या बाहुल्या बनवून पाटील सरांना दाखवल्या सरांना त्या आवडल्या आम्ही त्या प्राचार्य महाजन सरांना दाखवल्या त्यांनी तो विषय शिकविण्यासाठी व्हिजिटिंग लेक्चर म्हणून नियुक्ती केली.

शिरपूरला यात्रेत राजस्थानी कलावंताचा कठपुतली कार्यक्रम पाहून त्या कलेबद्दल अजून कुतूहल निर्माण झाले.घरात कुठल्याही प्रकारचा वारसा नव्हता त्यामुळे मार्गदर्शन कोण करेल याबाबत प्रश्न निर्माण झाले.

पण प्राचार्य महाजन सरांनी माझ्यासाठी माहिती गोळा करून ठेवली होती ते म्हणाले की पुण्याच्या एस.सी.ई.आर.टी.मध्ये 10 दिवसांचा कोर्स असतो. तेथे अर्ज केला आणि निवड झाली तर ते शिकवतात.

पण कलाशिक्षक म्हणून विनाअनुदानित अध्यापक विद्यालयात काम करत होतो. बरेचजण मला सांगत की फक्त अनुदानित विद्यालयातील शिक्षकांनाच तेथे प्रवेश मिळतो. त्यामुळे मला फार वाईट वाटले की, ज्यांना खऱ्या अर्थाने शिकायचे आहे त्यांना संधी नाही आणि ज्यांना त्यात मुळात रस नाही त्यांना संधी असे शिक्षक काय शिकणार आणि विद्यार्थ्यांना काय देणार हा मोठा प्रश्न होता.

एक कुतूहल म्हणून अर्ज करायला काय हरकत आहे म्हणून अर्ज केला म्हणतात ना दाने दानेपर लिखा है खानेवालेका नाम तस त्या प्रशिणासाठी माझी निवड झाली आमचे मार्गदर्शक आ.दिपक वाघमारे सर होते.

त्यांनी बाहुली नाट्याची (puppet show) माहिती दिली मात्र हातच राखून मला त्यातील बऱ्याच गोष्टींची माहिती हवी होती.. पण सरांचा सहकारी राजूभाऊ शिंदे यांनी मला मोलाची मदत केली त्यांनी सरांच्या पश्च्यात जून्या बाहुल्यांचे फोटो काढायला मदत केली होती.

त्यामुळे माझ्या जीवनातील मोठी कठपुतली तयार करु शकलो त्यासाठी राजुभाऊंचे उपकार कधीच विसरणार नाही आणि म्हणतात ना कधी वाईटातून देखील चांगले घडू शकते यासाठी वाघमारे सरांचे देखील आभारी आहे.

कारण त्यांनी तस केल नसत तर मला असं घडता आल नसत.तेथून सुरु झालेला बाहुली निर्मितीचा प्रवास आजतागायत सुरू आहे. माझ्याकडे लहान मोठ्या अशा जवळपास 60 बाहुल्या आहेत.

बाहुल्यांचे अनेक प्रकार आहेत जसे हातमोजा बाहुली, काठी बाहुली, छाया बाहुली, कठपुतली इलाच सुत्र बाहुली म्हणतात, बोट बाहुली, ह्युमन पपेट, वाटर पपेट आणि अजस्त्र पपेट आणि रामदास पाध्ये सर जी कला सादर करतात तीला शब्दभ्रमर म्हणतात व त्यासाठी जी बाहुली वापरतात तीला मपेट म्हणतात.

 माझ्याकडे हातमोजा, काठी बाहुल्या व कठपुतल्या आहेत. यातील बऱ्याच बाहुल्या स्वतः बनवलेल्या आहेत. काही बाहुल्यांची सुत्रे ही भारतीय व काहींची पाश्चात्य पध्दतीची आहेत.

पाश्चात्य सुत्रांसाठी विविध देशातील बाहुल्यांचा अभ्यास करून बनवले आहेत. वेळप्रसंगी पाश्चात्य कलावंताची मदत देखील प्राप्त झाली आहे. अशा या बाहुल्यांचा मदतीने “बाहुल्यांचे विश्व”  हा कार्यक्रम सादर करून मनोरंजनासोबत प्रबोधन ही करीत असतो.

 या निर्जीव बाहुल्यांशी मैत्री झाली आणि याच मित्रांनी मला जून 2014 मध्ये सोनीTV या प्रसिद्ध चँनलवरील प्रसिद्ध शो “एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा “मध्ये भाग घेता आले त्यात मानवी सापळ्याची बाहुली वापरली होती तीला त्यांनी “यो यो हड्डी सिंग” हे नाव दिले होते. त्या एक मिनिटाच्या सादरीकरणाने मला 11,111/- रूपयांचे बक्षीस मिळाले होते.

TV वर कार्यक्रम करण्याची ईच्छा पूर्ण झाली पुढच स्वप्न आंतरराष्ट्रीय स्तरावर कठपुतली न्रुत्य सादर करण्याची.योगायोग फेसबुकवर एक जाहिरात पाहिली आणि अर्ज केला."वर्ल्ड पपेट कार्निव्हल 2016" युरोप खंडातील पोलंडमधील लाँडझ येथे आयोजित या स्पर्धेतसाठी आलेल्या जगभरातील 77  देशातून 700 अर्जांमधून निवड झाली.

भारतातून एकमेव निवड होती त्यामुळे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.तेथे मराठी, हिंदी, अहिराणी अशा चित्रपट व लोकगीतांवर कार्यक्रम करून उपस्थितांची मने जिंकली होती. या स्पर्धेत 29 देशांचा समावेश होता. पारंपरिक कठपुतली कलेसाठी नामांकन देखील मिळाले होते.विनाअनुदानित अध्यापक विद्यालयात अल्प अशा मानधनावर कलाशिक्षकाची सेवा करत असल्याने जागतिक पातळीवर कला सादरीकरण करण्यासाठी दानशूर मंडळीनी आर्थिक सहकार्य केले.


जळगाव च्या जैन इरिगेशन प्रा.लि.च्या आ.अशोकभाऊ जैन यांनी येण्या जाण्याच विमान तिकीट करून दिले होते म्हणून हे साध्य झालं.2017 मध्ये कझाकस्तान येथे आयोजित स्पर्धेसाठी निवड झाली होती. पण आर्थिक बाबतीमुळे त्यांना स्पष्ट नकार दिला होता.

2018 मध्ये फुकेट, थायलँड येथे आयोजित  "हार्मनी वर्ल्ड पपेट फेस्टिव्हल 2018" (Harmony World  Festival) साठी निवड झाली ही स्पर्धा नव्हती. येथे 26 देशातील कलावंतांचा सहभाग होता. भारतातून महाराष्ट्रातील 2,कलकत्ता 1,दक्षिण भारत1,राजस्थान 1 असे पाच ग्रुप होते.

त्यात सोलो परफॉर्मर मी एकटाच होतो. माझ्या सवेत भारतातील प्रसिद्ध रामदास पाध्ये सर होते पण एका माँलमध्ये या जगभरातील कलावंतांसमोर सादरीकरण करण्याची संधी मला मिळाली होती. येथे मराठी, हिंदी, गुजराती गाण्यांवर कार्यक्रम सादर केला होता.

2019 मध्ये कुचिंग, मलेशिया येथे आयोजित "रेनफाँरेस्ट वर्ल्ड पपेट कार्निव्हल 2019" (Rainforest World Puppet Carnival) साठी निवड झाली येथे एकमेव भारतीय होतो त्यामुळे भारताचे प्रतिनिधित्व केले. येथे 17 देशातील कलावंतांचा सहभाग होता.

"पारंपरिक कठपुतली थिएटर" पुरस्कार मिळाला. तसेच परेडच्या दिवशी 630 लोक पपेट घेऊन सहभागी झाले व "मलेशियन बुक आँफ रेकॉर्ड" झाला त्यात आमचा देखील सहभाग होता.

     अनोख्या कलेच्या प्रेमात पडलो.कलेचे शिक्षण घेत असतांना देखील इतरांपेक्षा वेगळे प्रयोग करण्याची आवड होती. त्यामुळे कठपुतली कले सारखी लोप पावत चाललेल्या कले प्रती निष्ठा ,प्रेमा मुळे तीच जतन संवर्धन करून तीला अजून उंचीवर नेण्याची ईच्छा आहे.

       आपणास नम्रपणे विनंती आहे की, आता अध्यापक विद्यालयात 23 वर्षे 4 महिने कार्य करून राजीनामा द्यावा लागला त्यामुळे आता कुटुंबाच पालनपोषण फक्त कठपुतली न्रुत्य "बाहुल्यांचे विश्व" कार्यक्रमावर अवलंबून आहे. त्यासाठी शाळा,काँलेज,व्याख्यानमाला,वाढदिवस,गणेशोत्सव,नवरात्रोत्सव इ.आमंत्रित करून सेवा करण्याची संधी द्यावी. संमोहन शास्त्राद्वारे  10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून परीक्षेची भिती कमी करून आत्मविश्वास वाढी साठी प्रयत्न आहे  .

श्री.दिनेश मधुकर साळुंखे. 

संपर्क - 9860520603 , 7020072265



Thank you..!


Post a Comment

0 Comments