Recents in Beach

"चित्रकला आवड मग, निवड का नाही..?"

"चित्रकला आवड मग, निवड का नाही..?"

"चित्रकला आवड मग, निवड का नाही..?"


अगदी लहानपणापासूनच आपल्या प्रत्येकाला चित्रकलेविषयी आकर्षण राहिलेले आहे. असं असतानासुद्धा आपल्यातील प्रत्येकजण चित्रकार झाला असं नाही. प्रत्येकाने चित्रकारच व्हावे असे माझे म्हणणे नाही, मात्र रसिक होण्याचा प्रयत्न तरी त्याने करावा.

"प्रत्येक लहान मुलात चित्रकार दडलेला असतो पण, वाढत्या वयाबरोबर तो टिकून न ठेवणे ही आपली समस्या आहे.”असं पाब्लो पिकासो म्हणतो आणि ते सत्यच आहे. 

चित्रकला हा छंद म्हणून जोपासत असतांना त्यात करिअरच्या संधीही आहेत, या विषयावर पालकांशी संवाद साधण्याची गरज आहे. अजूनही बारावीनंतर माझ्या पाल्याला मी इंजिनियर, डॉक्टर किंवा अजून काही बनवेल, हे पालकच ठरवून टाकतात. यात पाल्याच्या क्षमतांचा विचार केला जात नाही.

“चित्र संस्कार अभियान” राबवितांना आमचा उद्देश हाच असतो. बालमनात चित्रकलेविषयी आकर्षण असतच. मात्र हे आकर्षण त्या विद्यार्थ्यांच्या छंदापुरता मर्यादित न राहता त्याचे, रूपांतर करिअरमध्ये होणे गरजेचे आहे.

आणि, यासाठी पालकांना जागृत करणे तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून चित्रकलेतील व्यावसायिक संधी घेऊन आपण पालकांचा समोर जातो तेव्हा ते शक्य होते.

इंजीनियरिंग, डॉक्टर, आर्किटेक्ट, इंटेरियर डिझाईन, फॅशन डिझाईन, या क्षेत्रात पालक त्यांच्या पाल्यांना शिक्षण घेण्यासाठी सहज होकार देतात. किंवा, शिक्षणाचा वारेमाप खर्च करण्यासाठीही तयार होतात. कारण, या क्षेत्रातील व्यावसायिक संधी पालकांना माहीत आहेत. 

चित्रकलेच्या बाबतीत असे क्वचितच घडते.माझ्या मित्राचा मुलगा इंजिनियर आहे. फक्त इंजिनियरच नाही, तर, तो केमिकल इंजिनियर, आहे किंवा त्याची मुलगी मेकॅनिकल  इंजिनियर, आयटी  इंजिनियर किंवा अजून कोणती इंजिनियर असेल, तर अशा सगळ्या ब्रांच पालकांच्या पाठ झालेल्या असतात.

असं कधी झालंय का हो..?
माझ्या मित्राचा मुलगा चित्रकार आहे.
तो लॅंडस्केप आर्टिस्ट आहे. किंवा तो सेट डिझायनर आहे,
किंवा पोट्रेट आर्टिस्ट आहे, झालंय कधी असं..?

आपल्या बाबतीत त्यांना एकच विषयी माहिती आहे तो म्हणजे ए.टी.डी म्हणजे कला शिक्षक बस.
म्हणून यासाठी, आपणही थोडे जबाबदार आहोतच याचा आपण प्रामाणिकपणे स्वीकार केलाच पाहिजे.

आपण कधी ऐकले का गणिताचा छंद वर्ग?
इतिहासाचा छंदवर्ग?
भाषेचा छंदवर्ग? मग चित्रकलेचाच का..?
छंदवर्ग हा कोणत्याही विषयाचा असू शकतो. मग, चित्रकलेवरच शिक्कामोर्तब का..?

एखाद्या विषयाची आवड जोपासणे ही, प्रत्येकाची खाजगी बाब आहे. आणि त्याने ती आनंदाने जोपासावी पण शिक्कामोर्तब करू नये.

म्हणून माझ्या मित्राचा मुलगा फक्त चित्रकारच नाही. 
त्याने अमुक-तमुक कॉलेजमधून बी.एफ.ए केले.( बॅचलर फाईन आर्ट जे कंसात लिहिलंय ते सुद्धा लिहायची गरज पडायला नको.) 

आणि तिसऱ्या वर्षाला त्यांना इलस्त्रेशन, सेट डिझायनिंग, फोटोग्राफी आणि कंप्यूटर ग्राफिक्स असे स्पेशलायझेशन विषय असताना, 

सेट डिझाईन हा विषय त्याने निवडला आणि त्यात करिअर केलं. आज तो मोठ्या सेट डिझायनरच्या चा असिस्टंट आहे. हे सगळं पालकाच्या. तोंडून निघालं पाहिजे आणि यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे.

“मग चित्रकला आवडच काय निवड सुद्धा होईल.”

भूषण निनाजी वले . उल्का फौंडेशन, जळगाव.


Thank you..!


Post a Comment

1 Comments