HIS DAY by SWATI CHANDORKAR
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार विश्वास मेहेंदळे यांनी एक आठवण सांगितली होती. दूरदर्शनवर विविध कार्यक्रम सादर करताना तृतीय पंथीयांवर एक कार्यक्रम करण्याची संधी त्यांना
मिळाली होती. तेव्हा त्यांनी एका तृतीय पंथीयाला वचारलं होतं, तुमच्यामध्ये माणूस मेल्यानंतर प्रेतयात्रा काढत नाहीत का? त्यावर त्या तृतीय पंथीयाने उत्तर दिलं होतं, काढतात; पण मध्यरात्रीनंतर. प्रेताला तिरडीवर बसवलं
जातं आणि मग आम्ही सगळे त्या प्रेताला चपलांनी खूप मारतो.
परत त्याने या जन्माला येऊ नये म्हणून. त्या तृतीय पंथीयाचं हे उत्तर तृतीय पंथीयांच्या वाट्याला येणाऱ्या अनंत यातनांची कल्पना आणून देणारं आहे. तृतीय पंथीयांच्या या वेदनांचा प्रवास स्वाती चांदोरकर यांनी हिज डे या कादंबरीतून शब्दबद्ध केला. हेलीना आणि चमेली या दोघींच्या प्रथमपुरुषी निवेदनातून ही कादंबरी साकारली आहे. हेलीनाने सायकॉलॉजी हा विषय स्पेशल घेतलेला असतो.
सायकॉलॉजीचा अभ्यास करताना ती तृतीय पंथीय या विषयाकडे ओढली जाते. याचं कारण असतं, तिची मैत्रीण चमेली. चमेली तृतीय पंथीयांच्या वस्तीत राहत असते.
तिचे वडील पुरुष असले तरी स्त्रीसारखं राहावं, असं त्यांना वाटायला लागतं आणि मग ते साडी नेसायला लागतात. हेलीनाला चमेलीकडून तृतीय पंथीयांविषयी जी माहिती मिळत असते, त्यामुळे तिचं मन ढवळून निघतं. शरीर स्त्रीचं, पण वर्तन (विशेषत: लैंगिक वर्तन) पुरुषासारखं करावंसं वाटणं किंवा शरीर पुरुषाचं, पण वर्तन स्त्रीसारखं करावंसं वाटणं, हा या लोकांना मिळालेला शाप असतो.
या कादंबरीतून त्यांच्या या शापित जीवनाचे अनेक पदर हेलीनाच्या प्रथमपुरुषी निवेदनातून उलगडतात. तृतीय पंथीयांचं हे जग पाहताना ती मनाने अनेकदा कोलमडते; पण परत उभी राहते. आकाश या मुलाशी तिची ओळख होते. तिच्या या कामासाठी आकाशचा तिला खंबीर पाठिंबा मिळतो.
ती आकाशशी लग्न करते आणि त्यांना मुलगाही होतो. तो मुलगा आहे, पण नंतर जर त्याच्यात तृतीय पंथीयाची लक्षणं निर्माण झाली, तर आपण दोघंही त्याला चांगल्या रीतीने समजावून घेऊ शकतो, अशी भावना हेलीना आणि आकाशची असते. या सकारात्मक भावनेपाशी ही कादंबरी संपते, हेलीना, चमेली, हेलीनाची आणखी एक मैत्रीण जया (जिला हेलीनाबद्दल शारीरिक आकर्षण वाटत असतं), हेलीनाची आजी, तिचे आई-वडील, आकाश इ. व्यक्तिरेखा हेलीनाच्या निवेदनातून साकारल्यामुळे वास्तव वाटतात.
हेलीनाचे आणि त्यांचे भावबंध थेटपणाने समोर येतात. तर तृतीय पंथीयांमधील मनोकायिक बदल, त्यांच्या मनोवेदनांचं जग स्वाती चांदोरकर यांनी अतिशय परिणामकारकतेने साकारलं आहे. ओघवत्या निवेदन शैलीमुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहे. या पुस्तकाचा अभिप्राय म्हणून प्रवीण दवणे यांनी स्वाती चांदोरकरांना लिहिलेलं पत्र या कादंबरीच्या सुरुवातीला उद्धृत करण्यात आलं आहे. त्यामुळे या कादंबरीचं मूल्य आणखी वाढलं आहे.
(पुस्तक परिचय या टेलेग्राम ग्रुप वरून साभार https://t.me/PustakParichay)

0 Comments