कलाविष्कार गृप












प.पु.महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या प्रगट दिनानिमीत्त कलाविष्कार गृपने महाराजांना शुभेच्छा व चि.पार्थ वि.चौधरी फैजपूर याने श्री रामजन्म पाश्वर्वभुमिवर 3 X 4 भव्य म्युरल आपल्या कल्पकतेतुन साकारले  व महाराजांना भेट दिले.



 यावेळी कलाविष्कार गृप,फैजपूरचे अर्जुन सोळुंके कलाशिक्षक विवरे यांनी आदिवाशी पाड्यांवर जाऊन तेथील मुलांना एकत्रित केले, चित्र  काढण्याची सोपी, त्यांना अवगत होईल अशा शैलीत, तेथील मुलांना त्यांच्या कल्पकतेनुसार चित्र काढुन दाखविले.

परिसरातील प्राणी,पक्षी,झाडे याचे रेखांकन केली,रंगकाम केले चित्रकलेची आवड त्यांना व्हावी व लेखनापेक्षा चित्र कसे सोपे ते सांगितले. कला व शैक्षणिक मार्गदर्शन केले, कलाविष्कार गृप तर्फे मुलांना शैक्षणिक साहित्यात वही ,पेन्सिल ,शॉपनरचे वाटप सुद्धा करण्यात आले.




यावेळी प.पू.महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराजांच्या अवतरण दिनानिमीत्त कलाविष्कार गृप,फैजपुर चेअध्यक्ष  .युवराज लोधी उपाध्यक्ष- अर्जुन सोळुंके ,कार्यक्रमाचे आयोजक  व्ही.ओ.चौधरी ,आर्टीस्ट व्हीजन,भुसावळ चे राजेंद्र जावळे,पार्थ चौधरी,कमलाकर कोष्टी यांनी आदिवाशी बांधवांना बुंदीचे लाडूंचे वाटप केले.

प्रसंगी   आदिवासी पाड्यातील महिला, पुरूष व मुले  मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाबद्दल महाराजश्रींनी अभिनंदन केले.


Thank you..!