Book -व्हिन्सेंट व्हान गॉग
लेखक - आयर्विंग स्टोन
अनुवाद - माधवी पुरंदरे

असं म्हटलं जातं की,कलाकार व महान व्यक्ती ह्या विक्षिप्त असतात,म्हणून त्या यशस्वी होतात.हा गुणंच त्यांना यशस्वी ठरवतो.परंतु ह्या गोष्टी असत्य आहेत.

प्रत्येक व्यक्तीत विक्षिप्तपणा सापडतो,म्हणजे ते कलाकार किंवा महान व्यक्ती असतात का? मुळीच नाही.
कलाकार किंवा महान व्यक्ती जिद्दीच्या व ध्येयवेडाच्या  जोरावर यशोशिखरावर पोहचत असतो.याचीच जाणीव व्हिन्सेंट व्हान गॉगचे चरित्र वाचल्यावर झाली.

व्हिन्सेंट व्हान गॉग एक डच चित्रकार होता.ज्याला जीवनभर फक्त उपेक्षाच दान म्हणून मिळाली.गॉगच्या आयुष्याचा शेवट ही खूप शोकात्मक झाला.

गॉग सुरुवातीला चित्रविक्रेता. सुस्वभावी,प्रेमळ,लाजाळू,व्यक्ती. गॉगचं पहिलं प्रेम उर्सुला.तिनंही गॉगला उपेक्षाच दिली. उर्सूलाला पाहण्यासाठी गॉग कित्येक मैल चालत असे.पण उर्सुलाने दाद दिली नाही. प्रेमभंगच्या
दुःखात गॉगने चित्रविक्रेत्याची नौकरी गमावली.

     येथूनच त्याच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं.  गॉग शिक्षक झाला,पण तिथेही त्याला उपेक्षा व दुःख याशिवाय काही मिळालं नाही.

आयुष्याच्या बेदर्द आघताची वेळ तर पुढे होती.तो धर्मगुरू बनून बोरिनाज या कोळासाखाणी वस्तीत रुजू झाला.बोरीनाजमधलं जनवरांहून ही भयंकर आयुष्य जगणारी माणसं पाहून गॉगचं हृदय विदीर्ण झालं.खाणीतील जीवघेणी कार्यपरिस्थिती,त्यात क्षणैक्षणै खंगुन मरणारी माणसं,पण अशाही परिस्थितीत खचून न जाता  गॉगने केलेली अपरिमित सेवा पाहून आपण ही व्याकुळ होऊन जातो.

             धार्मिक संस्थांचे रखवाले  गॉगला धर्मगुरूच्या  पदावरून काढून टाकतात
 मग सुरू होते व्हिन्सेंट व्हान गॉगची चित्रकार बनण्याची तपश्चर्या. चित्रकार बनण्याची धडपड तो वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी करतो, ते वयाच्या सद्दतिसव्या वर्षापर्यंत.फक्त दहा वर्षे चित्रकराचं त्याचं जीवन हे अत्यंत वादळी होतं.

          या वादळी जीवनात फक्त एकच व्यक्ती त्याचा आधार व छत्र होता तो म्हणजे त्याचा भाऊ तेओ.त्यानं मरेपर्यंत गॉगला सांभाळलं. जेव्हा गॉग आत्महत्या करतो तेव्हा याच दुःखकळेने तेओचाही काही दिवसात मृत्यु होतं.

        चित्रकार बनण्यचा प्रवास गॉग इतक्या वेगात पूर्ण करायचा प्रयत्न करतो की,त्याला वास्तवतेचं ही भान राहत नाही.महिन्यातले पंधरा दिवस उपास,आजार,अविरत अखंड कष्ट तरीही त्याच्या चित्रांना मान्यता मिळत नाही.
       द हेग,पॅरिस मधील त्याचं जीवन,इतर चित्रकारांबरोबर  होणारे त्याचे वाद, त्याचे चित्रकार मित्र त्यांची जुगल बंदी काही काळ तरी गॉगच्या जीवनात रस आणते.परंतु फक्त काही काळ.

 रंगाची किमया मिळवण्यासाठी तो आर्ल ला जातो.रंगाची किमया त्याला मिळते,पण त्याला इथं वेडाचे झटकेही मिळतात.

ध्येयवेडा माणूस खरंच वेडा बनतो ते इथं कळतं.
व्हिन्सेंट व्हान गॉगचं आयुष्य खरंच दुःखाचा कहर आहे.त्याच्या जीवनात एकच गोडवा होता तो म्हणजे चित्र.
व्हिन्सेंट व्हान गॉगच्या आयुष्याची सर्वात मोठी शोकांतिका कोणती असेल तर त्याच्या चित्राना मरणोत्तर लोकप्रियता मिळाली,त्याच्या हयातीत फक्त एकदाच त्याचं चित्र विकलं गेलं ते ही वेड लागल्यावर.
व्हिन्सेंटला वाटलं असेल आत्महत्या केल्यानंतर आपण हे जग कायमचं सोडू. पण त्यानं फक्त शरीर सोडलं होतं.तो तर आपल्या चित्रात केव्हाच अमर झाला होता.

आत्मचरित्र वाचावी ज्यांची जे ध्येयाने खरंच वेड होतात,कारण त्यातून आयुष्याचे खरे शहाणे धडे मिळतात ,आपण ही ध्येयाने वेड होण्यासाठी.

(पुस्तक परिचय या टेलेग्राम ग्रुप वरून साभार  https://t.me/PustakParichay)