Event

श्री स्वामी समर्थ विद्यालय, कुसुंबा 


रंग जादूचे


भारतात चित्रकलेचा इतिहास भरपुर वर्षे जुना आहे. अश्मयुगापासुनच मानवाने हा गुफेत चित्र काढायला सुरुवात केली. रंगविलेल्या आकारांतून साधलेली कलाकृती म्हणजे चित्र या आपल्या कलेच्या इतिहाला जतन करण्याचा आमच्या विद्यालयाचा छोटासा प्रयत्न.

आमचे विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहे.कलेची अभिरुची निर्माण व्हावी यासाठी आम्ही विविध उपक्रम घेत असतो.या कलासाधना करण्यासाठी आम्हाला जोड मिळाली ती उल्का फाउंडेशन जळगाव या संस्थेची.

यांच्या चित्रसंस्कार अभियानातून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये  मध्ये कलेचे बीज पेरले जात आहेत .
जे जे स्कूल ऑफ आर्ट, मुंबई . येथे कलेचे उच्च शिक्षण घेतले, अर्जुन बाविस्कर यांच्या रंगाच्या मैत्रीतून आमच्या विद्यालयात निसर्ग चित्रणाचे प्रात्यक्षिक दिले.

आमच्या  विद्यार्थ्यांसाठी हा  सुखद धक्काच होता रंगाची जादू काय असते,आमच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली , जे  होते तेच, आमच्या विद्यार्थांच्या ओठावर आले वा..! किती सुंदर..! ,तो दिवस खरच विद्यार्थांना विस्मरणीय होता .... 

चित्र-संस्कार अभियानच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या मनावर चित्रकला बिंबत आहे. या अभियानामधुनच भावी चित्रकार जन्माला येतील. 

उपक्रम राबवीत असतांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार करून हा उपक्रम असून, ग्रामीण भागातील पालकांच्या आर्थिक बाबी ह्या सर्व श्रुत आहेत.

नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यासाठी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका कु.प्रतिक्षा पाटील मँड्म यांचे मार्गदर्शन असते.चित्रकलेच्या कुठल्या उपक्रम संबधित असले की मँड्माचा नेहमी होकार असतो..ज्यांच्या मुळे नाविन्यपूर्ण गोष्ट घडली त्या उल्का फाउंडेशन जळगाव याचे आभार. 

कलासाधक.श्री अविनाश घुगे सर.
श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय कुसूंबा खुर्द ता जि जळगाव



Thank you..!