Shree Chitr Ganesh 

चित्र गणेश

"श्री चित्र गणेश"

दरवर्षी प्रत्येक घरात, काॅलनीत, चौकात वा गावात श्री गणरायाची स्थापना केली जाते. ही श्री गणरायाची मुर्ती प्लास्टिक, थर्माकोल, POP पासून अनेक कारागीर स्वतः वा कारखान्यांमधून बनवित असतात. मात्र या प्लॅस्टर आफ पॅरीसच्या मुर्ती पूर्णपणे नष्ट होत नाही. याचा वाईट परिणाम होवून प्रदुषण वाढते. ज्या भागात हे POP राहते तो जमिनीचा भाग नापीक होतो.. आणि ज्या श्रद्धेने आपण गणेश स्थापना करतो, तीच बुद्धीची देवता विसर्जनानंतर विद्रुप रुप धारण करते. 

काही पर्यावरण प्रेमींना शाडूमाती हा पर्याय मिळाला. पण शाडूमातीतही सिमेंट सारखीच रासायनिक प्रक्रिया केलेली असल्यामुळे ती ही पूर्णपणे नष्ट होत नाही. म्हणून प्रदुषण रोखण्यासाठी कलाशिक्षक प्रल्हाद सोनार यांनी 'श्री चित्र गणेश' हा पर्याय निवडला. 

घरी फलकावर रंगीत खडूंच्या सहाय्याने श्री गणरायाचे चित्र काढून त्याची प्रार्थना, पूजा करणे. विशेष म्हणजे चित्र काढण्यासाठी वेळही कमी लागतो आणि सहजपणे विसर्जनही केले जाते. विसर्जन करताना फलक ओट्यावर घेऊन प्रार्थना, आरती करुन पाण्यात थोडेसे गोमुत्र टाकून फलक धुवून टाकावा. म्हणजेच प्रदुषण मुक्त गणेशोत्सव साजरा करणे. 

चित्र गणेश
चित्र गणेश 

गेल्या वर्षापासून हा उत्सव साजरा करीत आहेत. तेव्हा मागील वर्षी धुळे जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष तथा किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डाॅ. तुषारराव रंधे तसेच शिरपुर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल साहेब त्यांच्या सहकारी टीम सोबत दर्शनाला येवून गेले होते. 

जेष्ठ नागरिक संघ, गौरव फौंडेशनचे पदाधिकारीही आले होते. सर्वांना ही संकल्पना खूप आवडली होती. चित्र गणेशा प्रमाणेच चित्रदुर्गेचीही स्थापना केली होती, आपणही फलक किंवा कागदावर श्री गणेशाचे चित्र काढून प्रदुषण मुक्तीसाठी हातभार लावू शकता.




Thank you..!