Recents in Beach

Online Drawing Session

Event (Online Drawing Session)

विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा वाघ नगर  जळगाव

"कलार्पण " भाग-२  या ऑनलाइन  चर्चा सत्राचे आयोजन 

विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा वाघ नगर  जळगाव.लाॅकडाउनच्या काळामध्ये   विद्यार्थ्यांपर्यंत आपला संपर्क कायम ठेवत कला जोपासत "कलार्पण" भाग  २  कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले.

 या कार्यक्रमामध्ये जळगाव चे प्रसिद्ध चित्रकार श्री. निरंजनशेलार सर तसेच श्री.  सुनील दाभाडे सर, मानव सेवा विद्यालय जळगांव यांना आमंत्रित करण्यात आले 64 कलांपैकी एका कलेपासून सुरुवात केली.

चित्रकला या कलेला घेऊन विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या प्रश्नांचा उलघडा करण्यासाठी एक मुलाखत  सत्राचे आयोजन करण्यात आले या मध्ये नेहा सुरळकर, नेहा चव्हाण  रिया  तडवी दिव्या लिंगायत अनुश्री देशपांडे मृणाल नेटके समृद्धी साळुंखे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

यातून निसर्ग चित्र, व्यक्ती चित्र, स्मरण चित्र वारली चित्रशैली  तसेच अजिंठा चित्रशैली बद्दल माहिती रंगसंगती कशाप्रकारे वापरावी पेन्सिलचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे,   या अनेक प्रश्नांची उत्तरे  निरंजन शेलार सरांनी ,सुनील दाभाडे सरांनी विद्यार्थ्यांना दिलीत.

सरांनी काढलेले काही काढलेली चित्रे मुलांना दाखवली, आमच्या विद्यार्थ्यांनी लाॅकडाउनच्या काळात काही चित्र रेखाटली होती ते चित्र सरांना दाखवून मार्गदर्शन घेतले , अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी सरांना प्रश्न  विचारली सरांनी त्यांच्या प्रश्नाचे समर्पक उत्तर दिले.

ऑनलाइन  घेण्यात आलेल्या या चर्चासत्रा मध्ये  विद्यार्थ्यांनी चित्रकारांशी मनमुराद गप्पा मारून  चित्यारकलेच्या विविध अंगांची माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाचे आयोजन  व आभार कलाशिक्षक श्री .वैभव काष्टे यांनी केले.

 कार्यक्रमाची प्रस्तावना  सौ दिपाली  सहजे दीदी यांनी केली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री हेमराज पाटील सर,  याप्रसंगी समन्वयक सौ वैशाली पाटील जयश्री वंडोळे  यांचे मार्गदर्शन लाभले.



Thank you..!


Post a Comment

0 Comments