Recents in Beach

"दिनविशेष स्केचेस उपक्रम"

Special Day Sketches

कलाशिक्षक एल.झेड.कोल्हे .

 दिनविशेष स्केचेस उपक्रम

वाढदिवसानिमित्त भेट कार्ड देण्याची पद्धत पूर्वीपासूनच आहे.मला कुठलेही वाढदिवसाचे निमंत्रण आले की, सप्रेम भेट देण्यात येणाऱ्या पाकिटावर मी त्या बाळाचे स्केच करून टाकत होतो. अलीकडे याचे स्वरूप बदलले. आता या सर्वांची जागा सोशल मीडिया म्हणजेच, व्हाट्सअप फेसबूक यांनी घेतली आहे.

उपक्रमाची सुरुवात 19 जानेवारी 2016 रोजी माझ्या सुनेच्या वाढदिवसानिमित्त झाली.वाढदिवसानिमित्त मी माझ्या सुनेला पेन्सिल माध्यमात काढलेले चित्र व्हाट्सअप वर शुभेच्छा म्हणून दिले. आणि, ते चित्र मुलाला व सुनेला खूप छान वाटले. 

त्यांनीच मला या उपक्रमाबद्दल सुचवले. हा उपक्रम त्यांना खूप सुंदर वाटला. असेही आपण वाढदिवसाच्या दिवशी भेटवस्तू देतोच. मग, या ठिकाणी भेट वस्तू देण्यापेक्षा चित्ररुपी भेट सर्वांनाच आवडेल असे त्यांनी सुचवले.

माझ्या सुनेच्या काढलेल्या चित्राचे नातेवाइकांकडूनही कौतुक झाले. त्यानंतर, जुलैमध्ये मुलाच्या वाढदिवसाला त्याचं स्केच पाठवले. आणि, त्यामुळे त्याच्या मित्रपरिवारातून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. 

असे करता करता पुढे लहान मुलांचे वाढदिवस साजरे करताना त्या मुलांची चित्र म्हणून मी त्यांना देऊ लागलो. आणि आसाच प्रतिसाद वाढत गेला. प्रतिसाद वाढत गेल्याने मी ही, उत्साही झालोपेन्सिल, पेन्सिल कलर, पेन वर्क, ब्रश वर्क असे विविध माध्यमात चित्र रेखाटण्यात सुरुवात केली.

2017 पासून मित्रमंडळींचे वाढदिवसाच्या निमित्त स्केच करणे मी सुरू केले. प्रतिष्ठित नागरिकांची, शिक्षक, आमदार, तसेच जयंती, स्मृतिदिन, सण-उत्सव यानिमित्तही चित्र मी स्केचेस मी करू लागलो.

24 मार्च 2018 ला जळगाव येथे पहिले लेवा गणबोली साहित्य संमेलन झाले. त्यात लेवा गणबोलीचे मानकरी, चाळीस साहित्यिकांचे स्केचेस करून त्याचे मोठे बॅनर बनवले होते. हा प्रेरणादायक प्रसंग होता.   

Lockdown  काळात हा उपक्रम अजून जोमाने सुरू झाला. या काळात जवळपास साठ स्केचेस माझ्याकडून काढली गेली. आणि अजूनही सुरू आहेत. यामध्ये थोर राष्ट्रसंत, राष्ट्रपुरुष, विचारवंत, कलावंत, यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त स्केचेस केली. 

जेणेकरून आजच्या पिढीला त्यांचे स्मरण होईल. तसेच कला शिक्षक बांधवांना दिनविशेष या विषयावर स्केचेस करता यावे व मुलांना त्याची माहिती मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर होता. मी सेवानिवृत्त कलाध्यापक असून आज मी सत्तर वर्षाचा आहे. 

पण सतत काम हा मंत्र मला विरंगुळा घालवण्यास व आनंद मिळण्यास उपयोगी ठरत आहे. माझ्या चित्ररूपी शुभेच्छा या आयुष्यभर प्रत्येकाला आठवणीत राहतील. 

माझे असे मत आहे की जोपर्यंत आपले सर्व अवयव काम करतात तोपर्यंत आपली कला सेवा सुरू ठेवा.म्हणजे, किरकोळ आजारांवर लक्ष जात नाही. 

मनानं आपण आनंदी राहतो. कुठली ना कुठली कला जोपासणे महत्त्वाचे आहे. सतत सराव सुरू ठेवा विविध माध्यमे वापरा. सरावामुळे निरीक्षण शक्ती वाढते व कार्यकुशलता येते. शिवाय आनंदी राहतो आणि काहीतरी काम केल्याचे संबंध समाधान मिळते.

समाजसुधारक दादाभाई नौरोजी.

समाजसुधारक दादाभाई नौरोजी.

थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ, एक समाजसुधारक, भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते. दादाभाई नौरोजी  यांना स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली (मृत्यू. ३०जून १९१७.)



पद्मश्री डॉ. विष्णू भिकाजी कोलते .

पद्मश्री डॉ. विष्णू भिकाजी कोलते .

स्व.थोर साहित्यिक, ग्रंथकार, संपादक, महानुभाव पंथाचे गाढे अभ्यासक, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू पद्मश्री डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते यांचा आज जन्मदिवस. त्यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन.(दि. 22 जून.)


डॉ. जब्बार पटेल.

डॉ. जब्बार पटेल.

जन्मदिवसानिमित्त डॉ. जब्बार पटेल यांचे केलेले स्केच.(दि. 23 जून.)


आचार्य प्रल्हाद केशव अत्रे.

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे.

पत्रकार विडंबनकार नाटककार शिक्षणतज्ञ कवी चित्रपटनिर्माते नेते वक्ते संयुक्त महाराष्ट्राचे प्रणेते.
स्मृतिदिनानिमित्त आदरांजली 


( sketches,sketch by pencil,sketches for drawing,sketch drawing,sketches for girls,sketches of girls,pen sketches,sketches pencil,sketches in pencil,drawing sketches,sketches to draw with pencil,sketches simple,skechers india,sketches artistic)


Thank you..!


Post a Comment

0 Comments