YouTube Channel सुरु करण्याचा विचार करताय?
मग बघा..! त्यासाठी तुम्हाला कोणत्या वस्तूंची गरज लागेल.
AUDIO :
Youtube वर व्हीडियो content आहे तरी, आपण ऑडीओविषयी सुरवातीलाच का बोलत आहोत? असा प्रश्न तुमच्या मनात आलेला असेलच.ऑडीओविषयी सगळ्यात अगोदर सांगण्याच कारण म्हणजे.YouTube रिसर्चनुसार तुम्ही जो VDO Content YouTube वर टाकता, त्याचा ऑडीओ चांगला नसेल तर, तुमचा viewer कंटाळवाणा होऊन, तुमचा व्हिडीओ बघणे सोडून देतो. त्यामुळे तुमचा ऑडीओ हा नेहमी चांगला असायला हवा. म्हणून आपण सर्वात अगोदर चांगल्या व्हाईस रेकोर्डिंग माईकची माहिती घेऊ.
Boya Lapel Microphone : बोया लेपल मायक्रोफोन
असे या माईकचे नाव आहे.हा माईक तुम्ही तुमच्या शर्टाच्या कॉलरला लाऊन सहजपणे रेकॉर्डिंग करू शकता.Boya Lapel Microphone ज्याला boya bym1 असेही म्हटले जाते.मोठ मोठे yutuber हि या माईक चा वापर करतात.Boya Lapel Microphone |
- Boya Lapel Microphone चे वैशिष्टे म्हणजे. आपण रेकॉर्डिंग करीत असताना आपला आजूबाजूच्या परिसरातील जो आवाज येतो ज्याला, background noise येत असतो त्याला Boya Lapel Microphone ८०% कमी करतो, त्यामुळे आपला आवाज हा बाहेरच्या वातावरणातही चांगल्याप्रकारे रेकॉर्ड होतो.Youtube वर जे नवीन आहेत त्यांच्यासाठी Boya Lapel MicrophoneTop best mic For youtube begginer मध्ये हा माईक नंबर १ वर आहे.
- Boya Lapel Microphone चे आणखी वैशिष्ट्य म्हणजे यात चारही बाजूनी रेकॉर्डिंग होईल.यासोबतच जर तुम्ही बाहेर व्हिडिओ शूट करीत असाल तर Noise Cancellation मुळे बाहेरच्या वातावरणात तुमचा आवाज स्पष्ट येतो.
- Boya Lapel Microphone सोबत तुम्हाला ३ मीटर केबल मिळते. म्हणजे जवळपास १८ फुट.यामुळे तुमचा मोबाईल किंवा कॅमेरा तुमच्या पासून दूर जरी असला तरी तुमचा आवाज चांगलाच रेकॉर्ड होणार.
Boya Lapel Microphone |
- Boya Lapel Microphone हा सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईल किंवा कॅमेऱ्याला सहजपणे जोडता येतो.मोड चेंज करण्यासाठी यावर एक बटन त्यावर आहे.
Boya Lapel Microphone |
Boya Lapel Microphone सोबत तुम्ही यावस्तूही वापरू शकतात.
VIDEO :
FullHD व्हिडीओ शूट होणारे मोबाईल आता प्रत्येकाकडे असतातच.त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलने चांगल्याप्रकारे शूट करू शकता.सुरवात म्हणून तुम्ही तुमचे व्हिडिओ मोबाईलवर शूट करावे, आणि जसं जसं तुमचे viewer वाढतील तसे तुम्ही अपग्रेड व्हा.त्यामुळे यासाठी अतिरिक्त खर्च करणे योग्य नाही.पण तरी तुम्ही खालील कॅमरा शूटसाठी वापरू शकता.
- Canon EOS 200D II 24.1MP Digital SLR Camera
- Canon PowerShot SX540HS 20.3MP Digital Camera
- Nikon D7500 20.9MP Digital SLR Camera
TRIPOD :
Tripod घेत असताना एक विचार करणे गरजेचे आहे.ते म्हणजे आपण घरात शूट करतांना आणि बाहेर चालता चालता शूट करतांना adjutable tripod वापरू शकू का?
जेणेकरून आपला खर्च वाचेल. साध्या सेल्फी स्टीकने हि तुम्ही व्हिडिओ करु शकता, मात्र त्यासाठी तुम्हाला मोबाईलच्या फ्रंट कॅमेऱ्याने शूट कराव लागेल.
Best Tripod In 2020 याची आपण माहिती घेतली तर, बरेच tripod आपल्याला मिळतील, पण आपल्या बजेटमध्ये ते बसणार नाहीत.
Best Tripod Under 1000 याचा विचार केला तर तुम्हाला खालील लिस्ट मधील आहेत.
- Ionix Made in India 9 feet Mobile Tripod Stand with Mobile Holder.
- Welkart 3110 Portable and Foldable Camera - Tripod with Mobile Clip Holder
- Tygot Adjustable Aluminium Alloy Tripod Stand Holder for Mobile Phones & Camera
Green backdrop :
आपण जर indoor शूट करीत आहात आणि जर, आपल्याला घरातील background ऐवजी दुसरे background हवे असल्यास editing करताना ते background आपण ग्रीन पडदा वापरून सोप्या पद्धतीने क्लीअर करू शकतो.आणि त्याऐवजी कोणतीही चांगली इमेज आपण वापरू शकतो.पण यामुळे तुमचा एडिटिंग करायला जास्त वेळ द्यावा लागेल.
त्याला पर्याय म्हणून आपण आपले व्हिडीओ हे Natural Light मध्ये शूट करण्याचा प्रयत्न करावा.जेणेकरून तुम्हाला याची गरज पडणार नाही.तुमचे viewer जेव्हा वाढायला सुरवात होईल तेव्हा तुम्ही हे खरेदी करू शकता.
तर मित्रांनो आज आपण youtube channel सुरु करण्यासाठी कोणत्या वस्तूंची गरज आहे याची माहिती घेतली. खालच्या लिस्ट मध्ये अजून काही product आहेत तुम्ही चेक करू शकता.
Thank you..!
0 Comments